Saturday, November 25, 2017

द किंग ऑफ ह्युमन नेटवर्किंग - डॉ. बबन जोगदंड

यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) येथील माध्यम आणि प्रकाशन केंद्रातील संशोधन अधिकारी ‘द किंग ऑफ ह्युमन नेटवर्किंग’ म्हणून परिचित असलेले डॉ. बबन जोगदंड यांचा 26 नोव्हेंबर रोजी जन्मदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर टाकलेला प्रकाश -


मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील हदगाव या छोट्याशा गावात डॉ. जोगदंड यांचा जन्म झाला. घरात कोणतीही शैक्षणिक पार्श्‍वभूमी नसतानाही त्यांनी डॉक्टरेटपर्यंत शिक्षण घेतले आणि आजही शिकत आहेतच. ‘आपला आपण करावा उद्धार’ या तत्त्वज्ञानाचा त्यांनी जाणत्या वयापासूनच अवलंब केला. स्वत:चाच नव्हे तर कुटुंबातील प्रत्येक सदस्यांना त्यांनी स्वत:च्या पायावर उभे केले. एवढेच नव्हे तर गावातील, तालुक्यातील, जिल्ह्यातील अनेकांना त्यांनी प्रेरणेच्या स्वरुपातील बळ दिले आहे.

शिक्षण
‘माणसाने सतत शिकत राहिले पाहिजे’ हे वचन डॉक्टरांनी प्रत्यक्ष उतरविले आहे. माणसाने दरवर्षी किमान एक पदवी/पदविका मिळविली पाहिजे, असे ते सतत म्हणतात. त्यामुळेच त्यांच्याकडे आजपर्यंत दहापेक्षा अधिक पदव्या आहेत. मराठी, तत्त्वज्ञान आदी विषयातील पदव्या तर शालेय व्यवस्थापनासा-या दुर्मिळ विषयात पदविका अशा प्रकारच्या शिक्षणाने ते समृद्ध झाले आहेत. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून त्यांनी प्रशिक्षण विषयावरच डॉक्टरेट प्राप्त केली आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी नोकरीसोबतच शिक्षण सुरु ठेवून आजतागायतची वाटचाल केली आहे. ती प्रत्येक तरुणाला प्रेरणादायी अशीच आहे.

जीवनकार्य
यशदाच्या माध्यम आणि प्रकाशन विभागातील नित्याच्या कामाशिवाय त्यांनी यशदाच्या प्रकाशनांची विक‘ी वाढविण्यासाठी प्रयत्न केले आहेत. यशदासाठी प्रशासकीय अनुभवांवर आधारित अनेक ग‘ंथांच्या निर्मितीत मोलाचे योगदान दिले आहे. नवमाध्यमे, नवतंत्रज्ञान या विषयांवर शासकीय अधिकारी, माध्यमकर्मी, स्वयंसेवी संस्था आदींसाठी त्यांनी यशदात प्रशिक्षण कार्यक्रम सुरु केले आहेत. उत्तम सूत्रसंचालक, आयोजक, प्रभावी वक्ता, लेखक, संपादक, पत्रकार म्हणूनही त्यांनी नावलौकिक मिळविला आहे. आजतागायत त्यांनी शाळा, महाविद्यालय, संस्था आदी अनेक ठिकाणी अनेक व्या‘याने दिली आहेत. अनेकांना नोकरी मिळविण्यासाठी, व्यवसाय उभारण्यासाठी त्यांनी बळ दिले आहे.

पुरस्कार
डॉ. जोगदंड यांना आजतागायत अनेक संस्था, संघटनांकडून स्थानिक, राज्य स्तरावरील अनेक पुरस्कार मिळाले आहेत. मात्र, त्यांना भेटलेल्या प्रत्येक माणसाच्या मनात त्यांनी निर्माण केलेले आदराचे स्थान हाच त्यांच्यासाठी दररोज मिळणारा पुरस्कार आहे.

जनसंपर्काचा आदर्श
डॉ. जोगदंड यांनी जनसंपर्क क्षेत्रात काम केलेले असल्याने जनसंपर्क हा त्यांचा मूळ पिंड आहे. त्यांनी स्वत:च्या वाणीवर आणि भाषाशैलीवर प्रभुत्व मिळविले आहे, याची प्रत्यक्ष अनुभूती त्यांना प्रथमच भेटणार्‍या व्यक्तीला जाणवते. ‘बोलणे चांगलेच हवे’, हा त्यांचा आग‘ह असतो. केवळ बोलण्यावर जगात अनेकजण कोट्यवधी रुपये कमावतात. माणसाला ती उपजत मिळालेली कला आहे, असे ते वेळोवेळी सांगतात. प्रभावी संवादकौशल्याच्या स्वभाव वैशिष्ट्यामुळे त्यांनी आजपर्यंत केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण भारतातील उच्च पदस्थ प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी, विविध क्षेत्रातील मान्यवर, कलावंत, साहित्यिक, सेलबि‘टीज्, मंत्री आदींशी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण केले आहेत. जनसंपर्क अधिकार्‍याचे मूर्तिमंत जिवंत उदाहरण म्हणजे डॉ. बबन जोगदंड म्हटले तर वावगे ठरू नये.

ह्युमन नेटवर्किंग
डॉ. बबन जोगदंड यांना प्रत्येकाने एकदा भेटावे, असेच त्यांचे व्यक्तिमत्व आहे. भेटलेल्या प्रत्येक व्यक्तिची ते आपुलकीने चौकशी करतात. त्यांचा व्यवसाय, नोकरी, शिक्षण आत्मियतेने जाणून घेतात. त्यानुसार आपण समोरच्या व्यक्तीला कशाप्रकारे संधी देऊ शकतो, याचा ते विचार करतात आणि अगदी सहजपणे संधी उपलब्धही करून देतात. अशाच प्रकारे त्यांनी ‘ह्युमन नेटवर्किंग’ सुरुच ठेवले आहे. कामाची गरज आणि मनुष्यबळाची उपलब्धता यांच्यातील दुवा म्हणून ते कोणत्याही अपेक्षेविना गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आहेत.

स्वभाव वैशिष्ट्ये
1) जिद्द: डॉ. जोगदंड यांनी एखादे काम हाती घेतली की त्या कामाचा निकाल लागेपर्यंत सातत्याने पाठपुरावा करतात. एखादे काम होईल की नाही याची चिंता न करता आपण जिद्दीने पाठपुरावा करत राहायचा. पाठपुराव्यामुळे आपली बरेच कामे सहजपणे होऊ शकतात, हा संदेश ते नेहमी देतात. काम पूर्ण करण्याची जिद्द हे त्यांच्या यशामागील एक रहस्य आहे.

2) वक्तशीरपणा: या जगात कोणालाही सहजपणे करता येईल अशी गोष्ट म्हणजे वक्तवक्तशीरपणा, असे डॉ. जोगदंड सांगतात. म्हणजेच जर तुम्ही तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट वेळेत केलीत तर अनेक न होणार्‍या गोष्टी, कामेही होऊ शकतात यावर त्यांचा ठाम विश्‍वास आहे.

3) उत्तम संभाषण: ‘माणसांना जोडणे’ हा डॉ. जोगदंड यांचा स्थायीभाव आहे. तुमची जात, धर्म, पंथ, संप्रदाय, व्यवसाय, नोकरी काय आहे यापेक्षाही ‘तुम्ही समोरच्याशी बोलता कसे?’ हे अधिक महत्त्वाचे असते. त्यामुळे संभाषण कौशल्य प्रत्येकाने आत्मसात केले पाहिजे, हा संदेश ते आपल्या कृतीतून देतात.

4) क्रि
याशीलपणा: माणूस म्हणून जन्माला आलो आहोत, त्यामुळे आपण सतत कार्यमग्न आणि क्रियाशील राहायला हवे, हा संदेश डॉ. जोगदंड वारंवार देतात. कि‘याशील राहिल्याने माणसाचा यशापर्यंत पोहोचण्याचा मार्ग सुकर होतो, असेही ते सांगता. ते स्वत:ही सतत क्रियाशील असतात. एकाच वेळी अनेक कामे करण्याची हातोटीही त्यांच्याठायी आहे.

5) महत्वाकांक्षीपणा: माणसाने महत्वाकांक्षी असले पाहिजे. जीवनात ध्येय ठरविले पाहिजे. फार मोठे नाही पण छोटी छोटी ध्येय ठेवून सतत पुढे जात राहिले पाहिजे, असा संदेशही ते देतात. त्यांनी त्यांच्या जीवनात छोटी-छोटी ध्येय ठेवत वाटचाल सुरु ठेवली. म्हणजे सर्वप्रथम नांदेडमध्ये जायचे. त्यानंतर उच्च शिक्षण घ्यायचे. त्यानंतर पुण्यात जायचे. पुढील ध्येय म्हणजे चांगली शासकीय नोकरी मिळवायची असे छोटे-छोटे ध्येय त्यांनी ठेवले आणि त्यात ते मिळविण्यासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली.

- व्यंकटेश कल्याणकर

डॉ. बबन जोगदंड समीक्षा पुरस्काराने सन्मानित


आष्टा कासार, ता. उमरगा जि. उस्मानाबाद लुंबिनी बुध्द विहार आणि समीक्षा फाउंडेशनच्यावतीने डाॅ. बबन जोगदंड यांना समीक्षा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.